वॉशिंग्टन : सध्या अब्जाधीश आणि टेस्लाचा मालक एलन मस्क भलताच चर्चेत आहे. त्याची एक पोस्ट रिपोस्ट झाली. त्याने वर एक फोटो रिपोस्ट केला आहे. त्यात त्याचं पेंट करण्यात आलेलं कॅरिकेचर दिसत आहे. या पेटिंगमध्ये मस्क काळा सूट आणि चष्म्यात दिसत असून बोर्डाच्या एका साईडला इशारा करत आहे. त्यावर लिहिलंय मेक किड्स नॉट वॉर.
त्यानंतर पाहता पाहता या पोस्टला ६६ मिलियन व् ूज मिळाले आहेत. या पोस्टच्या
अनुषंगाने अनेक चर्चा रंगल्या आहेत. मस्कचा स्वत:च्या पर्सनल लाईफकडे तर हा इशारा नाही ना? अशी चर्चाही रंगली आहे. मस्क नेहमीच लोकसंख्या वाढावी या मताचे राहिले आहेत. त्यामुळेच त्यांची पोस्ट व्हायरल होताच लोकांनी आपआपले तर्कट लावत आहेत. मस्क यांच्या घरी नवीन पाहुणा येणार वाटते? असे काही लोकांचे म्हणणे आहे.
मस्क यांना नेमकं म्हणायचे काय?
अमेरिकेत होणा-या बदलांचे प्रतिबिंब मस्क दाखवत आहेत, असे काही लोकांचे म्हणणे आहे. मस्क डोनाल्ड ट्रंपचे समर्थक आहेत आणि त्यांच्या सरकारचे एक भाग होते. ट्रंप यांच्या धोरणानुसार, अमेरिकने कोणत्याही युद्धात अडकणे टाळावे, असे मस्क यांना सूचवायचे असेल. अलीकडेच ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात सीझफायर करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही, रिपब्लिकन पार्टी त्यांच्या धोरणांचा विरोध करत आहे. अशा परिस्थितीत, मस्क त्यांच्या पोस्टद्वारे हे संदेश देऊ इच्छित आहेत की, आता युद्धाची समाप्ती होणे आवश्यक आहे आणि अमेरिकेने नेहमी युद्धांपासून दूर राहावे.