22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeराष्ट्रीयइंडिया आघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा

इंडिया आघाडीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा

नवी दिल्ली : इंडिया आघाडीवर प्रश्न उपस्थित होत असताना बुधवारी (६ डिसेंबर) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निमंत्रणावरून इंडिया आघाडीची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. आम आदमी पार्टी, सपा, द्रमुक, जेडीयू आणि आरजेडीसह १७ पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. इंडिया आघाडीच्या या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रमोद तिवारी, अधीर रंजन चौधरी, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, सय्यद नसीर हुसेन, रजनी अशोकराव पाटील, गौरव गोगोई आणि सुरेश कोडुकुनील सहभागी झाले होते.

ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि एमके स्टॅलिन यांच्यासह महाआघाडीत समाविष्ट अन्य प्रमुख नेत्यांच्या अनुपलब्धतेमुळे बुधवारी (६ डिसेंबर) संसदीय पक्षाच्या नेत्यांची समन्वय बैठक झाली आहे. आघाडीचा भाग असलेल्या ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) या बैठकीपासून अंतर ठेवले. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, एमके स्टॅलिन या बैठकीला उपस्थित नव्हते. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसशिवाय, जेडीयूचे लालन सिंह, तिरुची शिवा, द्रमुकचे टीआर बालू, सीपीआयएमचे इलामाराम करीम, आरजेडीचे डॉ. फैयाज अहमद, समाजवादी पक्षाचे डॉ. राम गोपाल यादव, राष्ट्रवादी काँग्रेसकडून वंदना चव्हाण, आम आदमी पार्टीकडून राघव चढ्ढा, सीपीआयकडून बिनॉय विश्वम, आययूएमएलकडून अब्दुल वहाब आणि ईटी मोहम्मद बशीर, एमडीएमकेकडून वायको, आरएलडीकडून जयंत चौधरी आणि केरळ काँग्रेसकडून जोस के मणी जावेद हे या बैठकीला उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR