33.7 C
Latur
Wednesday, March 19, 2025
Homeमहाराष्ट्रदत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण; बोपदेव घाटात बेदम मारहाण

दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण; बोपदेव घाटात बेदम मारहाण

पुणे : प्रतिनिधी
दिवस-रात्र प्रवाशांचा राबता असलेल्या स्वारगेट एसटी स्टँडवर गुरुवारी एका २६वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली. या प्रकरणावर राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. आरोपी दत्ता गाडेबद्दल धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. आरोपी दत्ता गाडेचे वकीलपत्र ज्यांनी घेतले आहे त्यांच्या सहकारी वकिलाचे काल अपहरण करून बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दत्ता गाडेचे वकीलपत्र वाजिद खान यांनी घेतले आहे. मारहाण करण्यात आलेले साहिल डोंगरे हे खान यांच्याकडे काम करतात. काल संध्याकाळी हडपसर भागातून डोंगरे यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना बोपदेव घाटात बेदम मारहाण करण्यात आली आहे. मारहाण केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. जखमी अवस्थेतच त्यांनी पोलिस स्थानक गाठले आणि तक्रार नोंदवली आहे.

वाजिद खान म्हणाले, काल रात्री माझे मित्र आणि सहकारी साहिल डोंगरे यांचे अपहरण करण्यात आले. हडपसर येथून त्यांना उचलले आणि बोपदेव घाटात त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली आहे. सध्या त्यांची परिस्थिती गंभीर आहे. वकिलावर अशा प्रकारे जीवघेणा हल्ला हे गैरकायदेशीर आणि चुकीचे कृत्य आहे, आम्ही याचा निषेध करतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR