17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरउदगीर-जळकोट-नांदेड बसमधील वाद ठाण्यात

उदगीर-जळकोट-नांदेड बसमधील वाद ठाण्यात

जळकोट : प्रतिनिधी
उदगीर -जळकोट -नांदेड ही बस दुपारी दीड वाजता निघते तर ती नांदेड येथे सव्वाचार वाजता पोहोचते मात्र या गाडीमध्ये दोन प्रवाशांमध्ये वाद झाला याचे रूपांतर किरकोळ हाणामारी झाले त्यामुळे चालकाने ही बस थेट नांदेड येथील वाजेगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आली. यामुळे या बसला तब्बल एक तास उशीर झाला मात्र सदरील प्रकरण यानंतर सामंजस्यांनी मिटले .

उदगीर आगाराची एम . एच २४- ए यू ८०५९ या क्रमांकाची बस जळकोट मार्गे नांदेड साठी निघाली होती दि ३ डिसेंबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजता जळकोट येथील बस स्थानकातून ही बस नांदेड कडे निघाली. कंधार येथील बस स्थानकामध्ये ही बस पोहोचल्यानंतर या बसमध्ये काही प्रवासी बसले व काही अंतरावर उस्मान नगरजवळ ही बस पोहोचतात. या बसमधील दोघा प्रवाशांमध्ये बाचाबाची सुरू झाली. याचे रूपांतर हाणामारीत झाले. चालक आणि वाहकास काही कळण्याच्या आतच हा प्रकार घडला.

काही केल्या हे दोन प्रवासी ऐकत नसल्यामुळे शेवटी चालक आणि वाहकाने ही बस नांदेड येथील वाजेगाव ठाण्यात नेण्यात आली. या ठिकाणी प्रकरणावर पडदा पडला परंतु या बसमध्ये झालेल्या हाणामारीमुळे ही बस तब्बल एक तास उशिरा नांदेड येथील बस स्थानकामध्ये पोहोचली. यामुळे प्रवाशांना एक तास ताटकळत बसावे लागले. प्रवाशांच्या या हाणामारीमुळे उदगीरकडे परत निघणा-या प्रवाशांची मात्र यामुळे गैरसोय झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR