पुणे : प्रतिनिधी
राज्याच्या विविध भागात उकाड्याची तीव्रता वाढत असताना मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात हवामान खात्याने हलक्या सरीच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र राज्याच्या अन्य भागात कमाल तापमान साधारणपणाने ३८ ते ४० अंश से.दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मध्यंतरीच्या काळात राज्याच्या काही भागात मध्यम स्वरुपाच्या सरींनी हजेरी लावली त्यानंतर कमाल तापमान ४० अंश से पर्यंत पोचले असल्याने उकाड्याच्या प्रमाणात वाढ झाली होती.आता पुन्हा वातावरणात थोडा बदल होत असून हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे काही ठिकाणी वादळी वा-यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.