31.4 C
Latur
Saturday, March 29, 2025
Homeराष्ट्रीयज्योती देवरेंना ‘सर्वोच्च’ झटका; खेड तहसीलदारपदी बेडसे यांची नियुक्ती

ज्योती देवरेंना ‘सर्वोच्च’ झटका; खेड तहसीलदारपदी बेडसे यांची नियुक्ती

नवी दिल्ली : खेड तहसिलदार नियुक्तीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. पण आता या याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत बेडसे यांना खेड तहसीलदारपदी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यमान तहसीलदार ज्योती देवरे यांची याचिका फेटाळली. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण/मॅट आणि उच्च न्यायालयाने तहसीलदार ज्योती देवरे यांची नियुक्ती आधीच रद्द केली आहे. देवरे यांच्या जागेवर तहसीलदार प्रशांत बेडसे यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात देवरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने पहिल्याच सुनावणी च्यावेळी या याचिकेमध्ये कोणतेही तथ्य नसल्याने याचिका दाखल करून घेण्यास पात्र नाही, असे नमूद करत फेटाळले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत प्रशांत बेडसे यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट)ने काही दिवसांपूर्वीच महसूल विभागाला दणका देताना खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश दिले होते. मॅटने ज्योती देवरे यांच्या जागेवर तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते.
पण पुढील सात दिवसात बेडसे यांना खेडच्या तहसीलदारपदी नियुक्त करण्याचे आदेश मॅटने दिले आहेत. प्रशांत बेडसे यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात मॅट आणि हायकोर्टात दाद मागितली होती. हायकोर्टाच्या सूचनेनंतर मॅटने देवरे यांची बदली रद्द करून बेडसे यांना नियुक्ती देण्याचे आदेश २५ फेब्रुवारी २०२५ रोजी दिले होते.

प्रशांत बेडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी मास्क घातले नाही, हे कारण हास्यास्पद असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटले होते. पण आता हायकोर्टाने बेडसे यांना दिलासा देत त्यांचे निलंबन रद्द केले होते. यानंतर आता मॅटनंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत बेडसे यांची खेडच्या तहसीलदारपदी पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR