34.8 C
Latur
Saturday, March 29, 2025
Homeराष्ट्रीयआता थेट यूपीआयद्वारे मिळतील पीएफचे पूर्ण पैसे

आता थेट यूपीआयद्वारे मिळतील पीएफचे पूर्ण पैसे

मे अखेरीस सुविधा सुरू होणार

नवी दिल्ली : तुम्ही सरकारी किंवा कोणत्याही खासगी क्षेत्रात काम करत असाल आणि तुमचा पीएफ दर महिन्याला कापला जात असेल, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आता यूपीआयद्वारे पीएफ दाव्याची(क्लेम) प्रक्रिया वेगवान करणार आहे.

कामगार आणि रोजगार सचिव सुमिता डावरा यांनी सोमवारी सांगितले की, यूपीआय मे महिन्याच्या अखेरीस ईपीएफओ ​​प्रणालीमध्ये जोडले जाईल. याचा फायदा ७.५ कोटी सक्रिय ईपीएफओ सदस्यांना होईल. त्यांना त्यांचे पैसे पीएफ खात्यात त्वरित हस्तांतरित करता येतील.

काय असेल नवीन यंत्रणा?
१ लाख रुपयांपर्यंतचे क्लेम आधीच ऑटोमेडेड आहेत, आता ते यूपीआयमुळे आणखी फास्ट होतील. याशिवाय, खातेधारक ईपीएफओ ​​खाते त्यांच्या यूपीआय अ‍ॅप्सशी लिंक करू शकतील (जसे गुगुल पे, फोन पे, पेटीएम). ऑटो-क्लेम सुविधा देखील उपलब्ध असेल. म्हणजे सभासद पात्र असल्यास लगेच पैसे जमा केले जातील. आतापर्यंत दाव्याच्या प्रक्रियेस ३ दिवस लागतात, यूपीआयनंतर तुम्हाला काही मिनिटांत पैसे मिळतील.

डेटाबेस आणि पेन्शन प्रणाली सुधारणा
ईपीएफओ ने प्रथमच केंद्रीकृत डेटाबेस तयार केला आहे, जो पूर्णपणे स्थिर होण्यासाठी २-३ आठवडे लागतील. ७८ लाख पेन्शनधारकांना आता कोणत्याही बँकेतून पेन्शन मिळू शकेल (पूर्वी फक्त काही बँकांना सूचित केले गेले होते). आरबीआयच्या सल्ल्याने केंद्रीकृत पेन्शन प्रणाली लागू करण्यात आली आहे.

रोजगाराशी संबंधित नवीन योजना
एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेचे बजेट १०,००० कोटी रुपयांवरून २०,००० कोटी रुपये करण्यात आले आहे. नोकरदार युवक, विद्यमान कर्मचारी आणि प्लॅटफॉर्म कामगारांना याचा फायदा होणार आहे. प्लॅटफॉर्म कामगारांना ऑनलाईन योजनेअंतर्गत मोफत आरोग्य विमा देखील मिळेल.

सुविधा कधी उपलब्ध होईल?
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून सूचना घेतल्यानंतर ईपीएफओ​​ने हा प्रस्ताव तयार केला आहे. मे महिन्याच्या अखेरीस फ्रंटएंड चाचणीनंतर यूपीआय लॉन्च केले जाईल. आतापर्यंत एटीएममधून पीएफचे पैसे काढण्याची चर्चा सुरू होती. मात्र, आता पीएफ खाते थेट यूपीआयशी जोडले जाईल. म्हणजेच, लोकांना एटीएमची गरजच भासणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR