32.5 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeमहाराष्ट्रवो मर जाएगा, लेकिन झुकेगा नहीं...

वो मर जाएगा, लेकिन झुकेगा नहीं…

कुणाल कामरा वादावर संजय राऊतांनी ‘पुष्पा स्टाईल’ दिले उत्तर

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने टीका केली. कुणाल कामराच्या ४५ मिनिटांच्या शोमधील काही भागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून उपरोधिक टीका करण्यात आली आहे. हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधित स्टुडिओमध्ये तोडफोड केली. यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘पुष्पा स्टाईल’ उत्तर दिले.

कुणाल कामराने २५ मार्च २०२५ रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हीडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये मुंबईत झालेल्या त्याच्या स्टँड-अप शोची आणि शोनंतर झालेल्या तोडफोडीची आणि निषेधाची क्लिप दाखवण्यात आली आहे. कुणाल कामराने त्याच्या स्टँड-अप कॉमेडीमध्ये गायलेले एक वादग्रस्त गाणे व्हीडीओमध्ये जोडले गेले आहे. यामध्ये शिवसेना समर्थक स्टुडिओची तोडफोड करतानाही दिसत आहेत. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, ‘कामरा ही अशी व्यक्ती आहे ज्याला मी वर्षानुवर्षे ओळखतो. ते असे कलाकार नाहीत की धमक्यांना घाबरतील. ते मरतील, पण झुकणार नाहीत. (‘वो मर जाएगा, लेकिन झुकेगा नहीं’). ही धमकी स्वत:पुरतीच ठेवा’.

कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार
कुणाल कामराच्या या व्हीडीओनंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील त्यांना माफी मागण्याचा इशारा दिला आहे. ‘‘अशा प्रकारची खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते, ज्यांच्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याविषयी असा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. पण अपमानित करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे’ असेही फडणवीसांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR