30.9 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeलातूरआजची संस्कारक्षम पिढीच उद्याचा सशक्त भारत घडवणार

आजची संस्कारक्षम पिढीच उद्याचा सशक्त भारत घडवणार

लातूर : प्रतिनिधी
स्रेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उपजत गुणांना वाव मिळतो. अध्ययना सोबत कला, क्रिडा क्षेत्रात करिअर संधी असुन श्री संकुलातील विद्यार्थी ग्रामिण भागातील असुन प्रचंड श्रम करण्याची क्षमता त्यांच्या मध्ये असते. क्षमता सोबत आत्मविश्वास असेल तर जगात विद्यार्थ्यांसाठी अशक्य कांहीच नाही. पालकांचा आपल्या मुलासोबत संवाद कमी होत आहे, ही खंत ही व्यक्त केली. श्री संकुल विद्यार्थ्यां मध्ये ज्ञान, तंत्रज्ञान व कौशल्या सोबत मूल्य संस्कारात रूजवत आहे.
आज ची संस्कारक्षम पिढीच उद्याचा सशक्त भारत घडवणार आहे, असे विचार प्राचार्य प्रशांत घार व्यक्त केले.
श्री बालक मंदिर, प्राथमिक, श्री माध्यमिक विद्यालय व श्री शामराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘श्री संकुल कला महोत्सव संस्कृतीचा’ कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळया प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्ञानदान प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. डॉ. दिलीप गुंजरगे, मुख्याधापिका सौ. मनिषा शिंदे, ज्ञानदान प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सरस्वती शिंदे, प्राथमिकचे मुख्याध्यापक घाटके व्ही. आर., प्राचार्य कुलकर्णी यांच्या उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात डॉ. गुंजरगे म्हणाले स्रेह संमेलन म्हणजे कलाविष्कार, सुप्त गुणांचे प्रदर्शन, विद्यार्थी शिक्षक व पालक यांनी एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात. श्री विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकांची विद्यार्थ्यां प्रति असलेली समर्पण व त्यागाची भावना यामुळेच विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होत आहेत. शेतकरी, कष्टक-यांच्या मुलांना आकार देण्याचे कार्य शिक्षक अहोरात्र करत आहेत. यामुळेच पालकांचा विश्वास आम्ही प्राप्त करू शकलो असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मनिषा शिंदे यांनी केले. सुत्रसंचलन विशाल गायकवाड व किरण जगताप यांनी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख  एस. डी. मोरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. स्रेह संमेलन सोहळ्यास विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR