29.7 C
Latur
Sunday, April 6, 2025
Homeराष्ट्रीयकिशोरवयीन मुलींमध्ये एंडोमेट्रिओसिसची समस्या

किशोरवयीन मुलींमध्ये एंडोमेट्रिओसिसची समस्या

प्रत्येक मुलींना शारीरिक शिक्षण गरजेचे आरोग्य विभागाकडून जागृकतेचे आवाहन

नवी दिल्ली : मासिक पाळीच्या काळात आपल्या शरीराकडे लक्ष देण्याचे शिक्षण प्रत्येक मुलीला दिले पाहिजे. विशेषत: वेदनांची तीव्रता व रक्तस्रावाचे प्रमाण ह्याबद्दल त्यांना शिक्षित करणे गरजेचे आहे. मासिक पाळीच्या काळात शरीराबाहेर टाकले जाणारे गर्भाशयाचे अस्तर म्हणजे एण्डोमेट्रिअम. अशाप्रकारचे अस्तर जेव्हा अंडाशयाभोवती आढळते, तेव्हा त्या स्थितीला एण्डोमेट्रिऑसिस म्हटले जाते.

पौगंडावस्थेतील मुलींना व त्यांच्या मातांना, एण्डोमेट्रिऑसिस आणि त्याच्या लक्षणांबाबत माहित असणे तसेच त्याचे वेळीच निदान करत उपचार करणे गरजेचे आहे. एण्डोमेट्रिऑसिसची लक्षणे नेमकी काय? आणि काय काळजी घ्यावी या बाबत देशातील स्त्रीरोगतज्ज्ञांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

एण्डोमेट्रिऑसिस हे बहुतेकदा अंडाशय, फॅलोपियन ट्यूब आणि इतर पेल्विक भागात पसरू शकते. एंडोमेट्रिओसिस सहसा प्रौढ महिलांमध्ये दिसून येते, मात्र हल्ली ही समस्या किशोरवयीन मुलींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आढळून येते. मासिक पाळीचे दुखणे समजून ब-याच वेळा एण्डोमेट्रिऑसिसकडे दुर्लक्ष केले जाते. या स्थितीचे नेमके कारण अद्याप ज्ञात नाही.

मात्र अनुवंशिकता, हार्मोनल असंतुलन आणि रोगप्रतिकारक प्रणालीच्या समस्या यासारखे घटक यास कारणीभूत ठरतात. किशोरवयीन मुलांमध्ये एण्डोमेट्रिऑसिसच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ओटीपोटात तीव्र वेदना, मासिक पाळीतील वाढता रक्तस्राव, कंबरदुखी, थकवा, आतड्यांमध्ये वेदना, सूज येणे, मळमळ, लघवी करताना वेदना होणे, मासिक पाळी दरम्यान स्पॉटिंग आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण यांचा समावेश असू शकतो.

एण्डोमेट्रिऑसिसची जागरूकता महत्त्वाची
एण्डोमेट्रिऑसिसची लक्षणे तीव्र होण्यापुर्वी त्यांचे वेळीच निदान होणे गरजेचे आहे. बहुतेक वेळा, एण्डोमेट्रिऑसिसला सामान्य मासिक पाळीतील वेदना म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे निदान होण्यास विलंब होऊ शकतो, ज्यामुळे ही स्थिती आणखी बिकट होऊ शकते. जर या विशिष्ट स्थितीवर त्वरित उपचार केले गेले नाहीत तर त्यामुळे अनेक गुंतागुंत होऊ शकतात ज्याचा किशोरवयीन मुलांच्या आयुष्यावर महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो.

भविष्यात गर्भधारणेवर होणार परिणाम
एण्डोमेट्रिऑसिसमुळे तीव्र वेदना होऊ शकतात जी अस आहेत, जास्त रक्तस्त्रावामुळे भविष्यात मुले जन्माला घालण्याच्या त्यांच्या क्षमतेवर देखील परिणाम होऊ शकतो. यामुळे इतर अवयवांनाही गंभीर नुकसान होऊ शकते, ज्यामुळे सूज येऊ शकते. या तीव्र वेदनांना तोंड देणे केवळ त्यांच्या शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करते. जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यावर निदान होते, तेव्हा डॉक्टरांना लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी योग्य उपचार करता येतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR