29.7 C
Latur
Sunday, April 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीयपंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान

पंतप्रधान मोदींना श्रीलंकेचा सर्वोच्च सन्मान

दोन्ही देशांमध्ये संरक्षणासह महत्वाचे करार

कोलंबो : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या श्रीलंका दौ-यावर आहेत. २०१९ नंतर पहिल्यांदात पीएम मोदी श्रीलंकेला गेले आहेत. श्रीलंकेने त्यांचे जोरदार स्वागत केले. श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान मोदींना श्रीलंका मित्र विभूषणाया हा सर्वोच्च गैर-नागरी सन्मान प्रदान केला.

या सन्मानानंतर पंतप्रधान मोदी यांनी हा १४० कोटी भारतीयांसाठी सन्मान असल्याचे म्हटले आहे. पीएम मोदींनी श्रीलंकेचे राष्ट्रपती, सरकार आणि जनतेचे आभार मानले आहेत. मित्र विभूषणय हा श्रीलंकेतील सर्वोच्च बिगर-नागरी सन्मान आहे. हा सन्मान परदेशी मान्यवरांना दिला जातो. श्रीलंकेशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या राष्ट्रप्रमुखांना श्रीलंका सरकार हे पुरस्कार देते. या पुरस्कारात रौप्य पदक आणि प्रशस्तिपत्र दिले जाते. हे पदक श्रीलंकेच्या ९ रत्नांनी सजवले आहे. यात चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि कमळाच्या पाकळ्या बनवलेल्या आहेत.

पदकावर पुन कलसा कोरलेले आहे. ते भाताने भरलेले भांडे असते. हे समृद्धी आणि नूतनीकरणाचे प्रतीक मानले जाते. पदकावरील सूर्य आणि चंद्र हे भारत आणि श्रीलंकेतील शाश्वत संबंधांचे प्रतिनिधित्व करतात. हा पुरस्कार २००८ मध्ये श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी सुरू केला होता.

दोन्ही देशांत संरक्षण करार
शनिवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके आणि पंतप्रधान मोदी यांच्यात प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये सात करारांवर स्वाक्ष-या झाल्या. भारत आणि श्रीलंका यांच्यात संरक्षण भागीदारी करार झाला. दोन्ही नेत्यांनी करारावर स्वाक्षरी केली. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

त्रिपक्षीय सामंजस्य करार
दोन्ही देशांमध्ये त्रिंकोमालीला ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी एक करारही झाला. दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती दिसानायके यांनी समपूर सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले. भारत आणि श्रीलंकेने श्रीलंकेला बहु-क्षेत्रीय अनुदान सहाय्य देण्यावरही सहमती दर्शविली आहे. दुसरीकडे, भारत, संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंका यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR