लातूर : प्रतिनिधी
रामनवमी व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खंडाळा तालुका जिल्हा लातूर येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना श्रीमती रीदाबाई शिंदे यांना अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत सिंचन विहीर पंचायत समिती, लातूर च्या वतीने मंजूर झालेल्या सिंचन विहिरीच्या कामाचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला.
याप्रसंगी लातूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले, भास्कर झाडके, अच्युत धाडके, पवन देशमुख, भैय्या गायकवाड, भैरवनाथ झाडके, दत्ता शिंदे, विष्णु शिंदे, श्रीमंत झाडके, नरहरी झाडके, खंडू शिंदे,
बाळू झाडके, विनोद शिंदे, लहू शिंदे, नवनाथ भालेकर, इस्माईल शेख, लहू शिंदे, गोपाळ पानढवळे हे उपस्थित होते.