22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरऔसा तालुक्यातील भेटा येथे ७० वर्षीय वृध्देवर अत्याचार करुन खून

औसा तालुक्यातील भेटा येथे ७० वर्षीय वृध्देवर अत्याचार करुन खून

औसा/ भेटा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील भेटा येथे एका नराधमाने भोळसर असलेल्या ७० वर्षीय वृध्देवर बलात्कार करुन खून केल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी की तालुक्यातील बोरगाव ( न) येथील एक ७० वर्षीय विधवा वृध्द महिला आसपासच्या गावात घरकाम, धुणी भांडी करुन आपली उपजिविका भागवत होती .

दि २३ आँगस्ट रोजी सदर महिला बोरगाव ( न ) येथून सकाळी आठ वाजता घरातून गेली होती. सदर महिला दुसऱ्या दिवशीही घरी आली नसल्याने तिच्या मुलाने आजूबाजूला व लातूरला भावाकडे, बहिणीकडे चौकशी केली पण ती कोठेच आढळली नाही. आज दि २६ आँगस्ट रोजी औसा ते मुरुड रस्त्यावर भेटा येथील मन्सूर सादीक होगाडे याच्या घरी एका महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला .

हा मृतदेह बोरगाव ( न ) येथील त्या वृध्द महिलेचा असल्याचे तिच्या मुलाने ओळखले . वृध्द महिलेचे हात, डोके, गळा हे घरातील लोखंडी रँकला साडीने बांधलेले होते व सदर वृध्दही निरवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने तिच्यावर मन्सूर होगाडे याने बलात्कार करुन साडीने गळा बांधून खून केला असल्याची तक्रार मयत वृध्देच्या मुलाने भादा पोलिस ठाण्यात केली असून याप्रकरणी मन्सूर होगाडे याच्या विरुध्द कलम १०३ (१)६४( १) ,१२७ ( ३ ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेचे गांभीर्य पाहून लातूरचे पोलिस अधिक्षक, आतिरिक्त पोलिस अधिक्षक यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR