22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeपरभणीअ. भा. विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात श्रीराम प्रतिष्ठानचे दुहेरी यश

अ. भा. विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात श्रीराम प्रतिष्ठानचे दुहेरी यश

सेलू : राज्य विज्ञान व गणित संस्था नागपूर आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२४ श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने तालुका स्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम तर ज्ञानतीर्थ विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला.

तालुका स्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन यशवंत महाविद्यालय सेलू येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, प्रमुख मार्गदर्शक उमेश राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे आदी उपस्थित होते. परीक्षक चव्हाण, खरात यांनी काम पाहिले. प्रमुख उपस्थिती यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य मुकुंद सोळंके, संचालन व
प्रास्ताविक श्रीमती काळे व श्रीमती पद्माकर यांनी केले.

या विज्ञान मेळाव्यात सेलू तालुक्यातील एकूण १७ शाळेचा समावेश होता. या अखिल भारतीय विज्ञान मेळाव्याचा यावर्षीचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता – संभाव्यता व आव्हान होता. एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलची इयत्ता ९वीतील विद्यार्थिनी तनिष्का तेलभरे हिने सादरीकरण व परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे दिली व प्रथम क्रमांक मिळविला. या विज्ञान मेळाव्यास मार्गदर्शक विज्ञान शिक्षक नारायण चौरे होते. तसेच ज्ञानतीर्थ विद्यालयाचा इयत्ता १०वीतील विद्यार्थी बालाजी सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे द्वितीय क्रमांक मिळविला. मार्गदर्शक शिक्षक पवार होते. या दोन्ही विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात झाली आहे.

या नेत्रदीपक कामगिरीसाठी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. सविता रोडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे , प्रिंसिपल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर यांनी अभिनंदन केले. जिल्हा स्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी शुभेच्या दिल्या. या यशाबद्दल विज्ञान शिक्षकांचे विशेष कौतुक केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR