नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू स्टेडियम गेट क्रमांक २ मधून प्रवेश करताना मंडप कोसळल्याची माहिती मिळत आहे. यात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आठपेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. अचानक मंडप कोसळल्याने लोकांची धावपळ उडाली होती. अनेकजण मंडपाखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशन दल घटनास्थळी आले होते. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये काम करणा-या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, कर्मचारी जेवणासाठी गेले असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. एएनआयएने यासंदर्भातील माहिती दिली आहे. दिल्ली पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.