22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeधाराशिवअंगावरून ट्रक गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

अंगावरून ट्रक गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

धाराशिव : प्रतिनिधी
रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून दारूच्या नशेत झोपलेल्या एका दुचाकीस्वाराच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात दि. १८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास सुकटा येथे घडला. रमेश दादाराव साळवे असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भूम पोलीस ठाणे येथे दि. २२ जानेवारी रोजी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पाडोळी ता. भूम येथील रमेश दादाराव साळवे हे दि.१८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत होते. ते दुचाकीवरून जात असताना सुकटा येथे आले असता त्यांनी दुचाकी रोडलगत लावून दारुच्या नशेत झोपले होते. दरम्यान उसाने भरलेल्या ट्रक चालकाने त्यांचे ताब्यातील ट्रक ही हायगई व निष्काळजीपणे चालविली. रोडलगत झोपलेले रमेश साळवे यांना धडक दिली. या अपघातात रमेश साळवे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. या प्रकरणी जयु रमेश साळवे यांनी दि.२२ जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- २७९, ३०४ (अ) सह १८४, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR