मुंबई : २०२४ वर्ष मॅडॉक फिल्मसच्या हॉरर कॉमेडी यूनिव्हर्सने चांगलेच गाजवले. २०२४ मध्ये रिलीज झालेले ‘मुंज्या’ आणि ‘स्त्री २’ या दोन्ही सिनेमांनी प्रेक्षकांचे प्रेम जिंकले. या सिनेमांच्या वेगळ्या विषयाला प्रेक्षकांंचे चांगले प्रेम मिळाले. काल मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मॅडॉक फिल्म्सने हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील आगामी सर्व सिनेमांची घोषणा रिलीज डेटसकट केली आहे. त्यामुळे पुढील एक-दोन वर्षात प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार, यात शंका नाही.
मॅडॉक फिल्मसने आगामी सिनेमांची घोषणा केलीय. हे सिनेमे पुढीलप्रमाणे आहेत. थामा- दिवाळी २०२५, शक्ती-शालिनी ३१ डिसेंबर २०२५, भेडिया २ – १४ ऑगस्ट २०२६, चामुंडा – ४ डिसेंबर २०२६, स्त्री ३- १३ ऑगस्ट २०२७, महा मुंज्या – २४ डिसेंबर २०२७, पहला महायुद्ध- ११ ऑगस्ट २०२८, दुसरा महायुद्ध – १८ ऑक्टोबर २०२८, अशाप्रकारे मॅडॉक फिल्मसने आगामी ८ सिनेमांची घोषणा केली आहे. विशेष गोष्ट म्हणजे मॅडॉक फिल्मसचा आगामी ऐतिहासीक सिनेमा ‘छावा’ या वर्षी फेब्रुवारी २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे पुढची ४ वर्ष प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार यात शंका नाही.