28.8 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeमहाराष्ट्रओबीसी आरक्षणाला धक्का; आता लाख मराठाऐवजी, लाख ओबीसी

ओबीसी आरक्षणाला धक्का; आता लाख मराठाऐवजी, लाख ओबीसी

बीड : शिंदे सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढत मराठा आरक्षणाला मान्यता दिली आहे. त्यानंतर बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन करत एक आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, आता कुणबी प्रमाणपत्रे घेऊन मराठा समाजातील एक पिढी आता ओबीसीमध्ये आली आहे. आता त्या लोकांनी एक मराठा लाख मराठाऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावे, असे आवाहन त्यांनी जरांगेसह मराठा आंदोलनकर्त्यांना केले आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, सरकारने मराठा आरक्षणाबाबतीत काढलेल्या अध्यादेशाला १६ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या काळात काय आक्षेप येतील आणि ते कायद्यात बसतील का? हे पाहावे लागणार आहे.

त्याशिवाय त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आली भूमिका स्पष्ट करत सांगितलं की, मराठा समाजाला कायद्यात बसणारे आरक्षण मिळाले पाहिजे ही माझी भूमिका कायम आहे. त्यामुळे जेव्हा या अध्यादेशावर शिक्कामोर्तब होणार तेव्हा ख-याअर्थाने अभिनंदन करावे लागणार आहे.
तर मराठा आरक्षणानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मराठाला आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे वारंवार सांगण्यात येत होते. मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलाच आहे अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे.

त्या पुढे अशाही म्हणाल्या की, पूर्वी विदर्भातील लोकांनी आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांनाही कुणबी जातप्रमाणपत्र घेतले. मात्र मराठवाड्यातील नागरिकांनी ते कधीही घेतलं नाही. विदर्भ, पश्चिम महाराष्टातील लोकांसोबत मराठवाड्यातील लोकांनी तेव्हाच प्रमाणपत्र घेतले असते तर आजही परिस्थिती निर्माण झाली नसती. पण त्यांना आता पुढील पीढीसाठी कुणबी प्रमाणपत्र हवे आहे. त्यामुळे नाही नाही म्हणतानाही ओबीसीला धक्का लागलाच आहे. आता यापुढे दोन्ही समाजातील वितुष्ट संपुष्टात यावे आणि हा निर्णय टिकल्यास जातीवाचक भांडण होऊ नयेत, अशी अपेक्षाही पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR