23.1 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन होणार

ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन होणार

मुंबई : ओबीसींच्या हक्कासाठी जालन्यातल्या वडीगोद्री येथे ९दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरु आहे. शुक्रवारी सरकारच्या शिष्टमंडळाने हाकेंची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी ओबीसींचे शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये एक बैठक संपन्न झाली.

ओबीसी शिष्टमंडळामध्ये मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रकाश शेंडगे यांच्यासह ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती. तर सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्र्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर एक माहिती हाती येत असून ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR