लखनौ : उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद पोलिसांनी समाजवादी पक्षाचे आमदार हाजी नासिर कुरेशी, त्यांचा मुलगा आणि सून आणि २३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्वांविरुद्ध गालशहीद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सपा आमदार आणि त्यांच्या नातेवाईकांवर वक्फची जमीन जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना या घटनेला विरोध करणा-या लोकांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे.
गालशहीद पोलिस ठाण्यात सपा आमदारासह २३ जणांविरुद्ध कलम ३०७, ४५२, ५०६, ५०४, ३२३, १४९, १४८ आणि १४७ आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार रईस आणि त्यांचा मुलगा अमीर फैसल यांच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रईसच्या म्हणण्यानुसार, समाजवादी पक्षाचे आमदार हाजी नासिर कुरेशी आणि त्यांच्या नातेवाईकांची एक टोळी आहे ज्यांना आमची वक्फ मालमत्ता ताब्यात घ्यायची आहे.