22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeधाराशिवराष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांच्यावर आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांच्यावर आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील, त्यांचे उमेदवार प्रतिनिधी रेवणसिद्ध लामतुरे यांच्या विरोधात दि. ३१ मे रोजी तब्बल सव्वा महिन्यानंतर आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी सभेची परवानगी न घेता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेवून आचार संहिंतेचा भंग केला आहे. या प्रकरणी धाराशिव नगर परिषदेतील लिपिक कालिदास कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. अर्चना पाटील यांच्यावर आचार संहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

लोकसभा निवडणुीची सध्या आचार संहिता सुरूच आहे. धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी दि. १९ एप्रिल रोजी मोठे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी सभा घेण्यासाठी संबंधित नगर परिषदेची रितसर परवानगी घेणे गरजेचे होते. परंतु त्यांनी परवानगी न घेता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रस्त्यावरच सभा घेतली. या सभेला राज्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, मंत्री संजय बनसोडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीचे धाराशिव, सोलापूर, लातूर जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय सभेसाठी हजारो कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.

सभेसाठी हा रस्ता काही काळ बंद ठेवण्यात आला होता. सभेसाठी नगर परिषदेची परवानगी न घेता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेऊन उमेदवार अर्चना पाटील, त्यांचे प्रतिनिधी रेवणसिद्ध लामतुरे यांनी आचार संहितेचा भंग केला. या प्रकरणी नगर परिषदेचे लिपिक कालिदास रामचंद्र कुलकर्णी यांनी दि. ३१ मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.सं. १८८, ३४ सह कलम १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR