धाराशिव : ‘मागील केसमधील तुझे वडील, चुलते, भाऊ, आई व नातेवाईक यांचा जामीन रद्द करायला लावतो, तुझे १८ वर्षे पूर्ण झाले आहे त्यामुळे तुला अटक करायला लावून जेलमध्ये टाकायला लावतो व तुझे करिअर बरबाद करू अशी धमकी देऊन शिवीगाळ करून मानसिक त्रास दिल्याने आणि त्याच्या जाचास व त्रासास कंटाळून शिवम शिरसट यांनी आत्महत्या केली असल्याची तक्रार मयत व्यक्तीचा काका शहाजी शिरसट यांनी दाखल केली.
दरम्यान, मयत शिवम सतीश शिरसट (वय १८ वर्षे, रा. पळसवाडी, ता. धाराशिव) यांनी दि. १८ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वा. राहत्या घरातील स्लॅबच्या हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणात बाळासाहेब मारुती कोळगे, रोहित बाळासाहेब कोळगे, नानासाहेब दत्तात्रय कोळगे (सर्व रा. पळसवाडी, ता. धाराशिव) यांनी मयत शिवम यास धमकी देऊन आणि शिवीगाळ करून मानसिक त्रास दिल्याने शिवम शिरसट याने आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनुसार आरोपींविरोधात धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.