सोलापूर : तरुणास जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेल्याप्रकरणी डोडोएन कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दळवे-पाटील दुकानाच्या कंपाउंडलगत बाळे येथे घडली.
याप्रकरणी चंद्रशेखर श्रीधर पवार (क्य ६९, रा. पाटोदा, बि. पाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डोडोएन कारखाना, (मुरुड ता. जि. लातूर) चे शेतकी अधिकारी राजेश तवले-पाटील व त्याच्यासोबत असणारे काही इतर लोक यांच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचा मुलगा ओंकार चंद्रशेखर पवार यांच्याबरोबर ऑगस्ट २०२३ मध्ये डीडीएन शुगर कारखान्याच्या ऊसतोड करून वाहतूक करणारा करार कारखान्याचे चेअरमन व कारखान्याच्या शेतकी अधिकारी तवले-पाटील या तिघांमध्ये शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपरवर झाला होता.
तसेच १५ लाख रुपये करारापोटी मिळाले होते. मात्र, फियांदीचा मुलगा ओंकार व कामगार ओंकार लोखंडे असे दोघे हायवेंस्टर मशीन बिघडल्याने ते दुरुस्त करण्यासाठी फिर्यादीचा मुलगा ओंकार हा मशिनरीचे सामान घेऊन येण्यासाठी वरील ठिकाणी दुकानाजवळ आला असता, संशयित आरोपीने बोलेरो जिपमध्ये येऊन ओंकारला गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून नेले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भालशंकर हे करीत आहेत.