28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रदोन गटात तुंबळ हाणामारी; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर

दोन गटात तुंबळ हाणामारी; एकाचा मृत्यू, तिघे गंभीर

नालासोपारा : प्रतिनिधी
दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपा-यातील संतोष भवनच्या कारगिल इथं झालीय. जुन्या भांडणाच्या रागातून पुन्हा एकदा दोन गटात शुक्रवारी उशीरा रात्री हाणामारी झाली.
यात एकमेकांवर चाकूने वार करण्यात आले आणि यातच एकाचा मृत्यू झाला. हाणामारीवेळी केलेल्या चाकू हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हा दाखल केला असून एकाला ताब्यात घेतले आहे. जखमी झालेल्यांवर शताब्दी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलावरून दोन्ही गटात दोन ते तीन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याच मागील भांडणाचा राग मनात धरून शुक्रवारी रात्री चाकूने हाणामारी झाली आहे. आरोपी रफिक, सलीम आणि त्यांच्या चार साथीदारांनी चाकूने वार करून दिपू उर्फ दीपक पाल याला जीवे ठार मारले. तर आकाश पाल आणि शुभम ठाकूर यांच्यावर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत गंभीर जखमी केले आहे.

हाणामारीत जखमी झालेल्या दोघांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. तर दुस-या गटातील सलीमवर चाकूने वार झाले असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणीही तुळींज पोलिसांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान तुळींज पोलिसांनी कमालीचे मौन पाळले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR