इंफाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांचा समावेश असलेले एक शिष्टमंडळ न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती एमएम सुंदरेश, न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह शनिवारी मणिपूरला पोहोचले आहेत.
शिष्टमंडळाने चुराचंदपूर येथे मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराच्या निर्वासितांची भेट घेतली. तसेच मदत छावण्यांना भेट दिली. यानंतर शिष्टमंडळ बिष्णुपूरमधील मोईरांग कॉलेजमध्ये पोहोचले. न्यायमूर्ती गवई यांनी चुराचंदपूरमध्ये २९५ कायदेशीर सेवा शिबिरे, आरोग्य शिबिरे आणि कायदेशीर मदत क्लिनिकचे उद्घाटन केले. ते म्हणाले आपल्या संविधानाचे उद्दिष्ट सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रदान करणे आहे.
त्याच वेळी, न्यायमूर्ती कोटिश्वर सिंह म्हणाले मला विश्वास आहे की एक दिवस मणिपूरची भरभराट होईल. आपल्याला आपल्या संविधानावर विश्वास असला पाहिजे. एक दिवस मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि ती यशस्वी होईल. येथे मदत देण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे.