22.1 C
Latur
Thursday, September 26, 2024
Homeलातूरमराठा आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील दाम्पत्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

मराठा आरक्षणासाठी लातूर जिल्ह्यातील दाम्पत्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

लातूर : राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापताना दिसत आहे. लातूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून मनोज जरांगे यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलले आहे. अहमदपूरच्या ज्ञानोबा तिडोळे आणि पत्नी चंचला तिडोळे या दोघांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून बीड मधील मराठा आरक्षणासाठी जीव संपवल्याची सुसाईड नोट देत आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना मराठवाड्यात आणखी एक असाच प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सहा वेळा उपोषण केले आहे. मात्र उपोषण करूनही सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. तसेच मराठा आरक्षण दिले नाही. याच्या निराशेतून या पती-पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अहमदपूर मधील राहणा-या या जोडप्याने मराठा आरक्षणासाठी विष पीत आत्महत्येचा प्रयत्न केला.

दरम्यान, वेळीच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचा सांगण्यात येत आहे. मराठवाड्यात यापूर्वीही बार्शीतल्या तरुणाचे सुसाईड नोट देऊन मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवल्याची घटना घडली होती. आता लातूरच्या अहमदपूरमधील जोडप्याने विष पीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR