22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeपरभणीलोक अदालतीमध्ये ७३ आरोपींना ठोठावला साडेचार लाखांचा दंड

लोक अदालतीमध्ये ७३ आरोपींना ठोठावला साडेचार लाखांचा दंड

परभणी : जिल्हा न्यायालयाने दि. ९ डिसेंबर रोजी अयोजीत केलेल्या लोक अदालतीमध्ये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, परभणी, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक परभणी व दुय्यम निरीक्षकराज्य उत्पादन शुल्क परभणी यांनी अवैध ढाब्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम नुसार नोंदविलेल्या गुन्ह्यातील जिल्ह्यातील एकुण २० प्रकरणातील १६ ढाबा मालक/चालक आणि ५७ मद्यपी (ग्राहक) अशा एकूण ७३ आरोपींना मा. न्यायालयाने एकुण रूपये ४ लाख ६७ हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.

यात परभणी जिल्ह्यातील हॉटेल चौरंगी कारेगाव शिवार, हॉटेल बाबाचा ढाबा पाथरी रोड, हॉटेल न्यू भारत अण्णा भाऊ साठे चौक, हॉटेल वाडा कारेगाव शिवार, हॉटेल कावेरी वसमत रोड, हॉटेल पद्यावती विसावा कॉर्नर, हॉटेल बगीचा पारवा शिवार, हॉटेल न्यु अंबिका कारेगाव शिवार, हॉटेल गोल्ड ढाबा वसमत रोड, हॉटेल आई भवानी जिंतुर रोड, हॉटेल न्यु आईभवानी वसमत रोड, हॉटेल अथिती पाथरी रोड, हॉटेल वांगीकर वसमत रोड या ढाबा मालक/चालकांना आणि या ठिकाणी मद्य सेवन करणा-या ग्राहकांना मा. न्यायालयाने दंड ठोठावला आहे.

लोक अदालतीमध्ये सदर गुन्हे निकाली काढण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजयकुमार सुर्यवंशी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक सुनिल चव्हाण यांच्या आदेशाने तसेच राज्य उत्पादन शुल्क नांदेड येथील विभागीय उपआयुक्त उषा वर्मा यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनात राज्य उत्पादन परभणी विभागाचे निरीक्षक सु.अ. चव्हाण तसेच सर्व दुय्यम निरीक्षक ए.जे. सय्यद, अ.वा. केंद्रे, एस.एल. बोंडले, सहाय्यक दुय्यम निरीक्षक यु.वि. शहाणे तसेच त्यांचे सहकारी कॉन्सटेबल राहुल बोईनवाड, चक्रपाणी दहीफळे, आर.पी. साळवे, राहुल चौहान, सागर मोगले तसेच वाहन चालक बी.जी. पुपलवार, बालाजी कच्छवे, विजय टेकाळे यांनी सहकार्य केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR