24.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमहाराष्ट्रवर्धा येथे टायरच्या गोदामाला आग लाखोंचे नुकसान

वर्धा येथे टायरच्या गोदामाला आग लाखोंचे नुकसान

वर्धा : प्रतिनिधी
येथील पावडे चौकातील टायरच्या गोदामाला अचानक आग लागली. ही घटना शुक्रवारी सकाळी ७:३०च्या सुमारास घडली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे १२ बंब प्रयत्न करीत आहेत.

टायरच्या गोदामाला सकाळी अचानक आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्ध्यासह हिंगणघाट, पुलगाव, देवळी आदी ठिकाणांहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवळपास १४ बंब आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत. मात्र, वृत्त लिहीपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले नव्हते. टायरच्या धुरामुळे परिसरात सगळीकडे काळोख पसरला आहे. पोलिस, आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत लाखोंचे टायर जळून खाक झाले आहेत. सकाळी काही महिलांना गोदामातून धूर निघताना दिसला. त्यानंतर आगीचे लोळ उठले. दरम्यान, लगतच्या घरातील सर्व सिलिंडर बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र, गोदामात काही सिलिंडर असल्याची माहिती आहे. त्यामुळे अग्निशमन दलाचे कर्मचारी काळजी घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR