29 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईच्या कामाठीपुरा भागातील इमारतीला आग

मुंबईच्या कामाठीपुरा भागातील इमारतीला आग

मुंबई : मुंबईतील कामाठीपुरा भागातील एका इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली. इमारतीच्या दुस-या मजल्यावर ही आग लागली असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन विभागाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत असून, अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईच्या ग्रँट रोड येथील कामाठीपुरा परिसरातील गल्ली क्रमांक ३ मध्ये ही घटना घडली असून, येथील एका इमारतीच्या दुस-या मजल्यावर ही आग लागली आहे. या परिसरात नेहमी वर्दळ असते. या घटनेमुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR