22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे रेल्वे स्टेशनवर उभ्या डब्याला भीषण आग

पुणे रेल्वे स्टेशनवर उभ्या डब्याला भीषण आग

पुणे : पुणे रेल्वे जंक्शन यार्डातील एका रिकाम्या डब्याला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, या घटनेत आजूबाजूच्या इतर दोन डब्यांचेही नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीचे कारण अजून समजू शकलेलं नाही. ही घटना १३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजून ५८ मिनिटांनी घडली. कंप्रेसर रूम क्रमांक ४ रेल्वेजवळ ही घटना घडली असून परिसरात असलेल्या तीन डब्यांपैकी एका डब्याला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दिवसांपासून हे डबे या ठिकाणी पडून आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आधी वीजपुरवठा खंडित केला आणि त्यानंतर आग आटोक्यात आणण्यास सुरुवात केली. ३० मिनिटांत आग विझवण्यात आली. दरम्यान, रेल्वे कर्मचा-यांनी इतर दोन डबे सुरक्षित स्थळी आणले. विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या २० जवानांनी आग आटोक्यात आणली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR