नवी दिल्ली : केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून अयोध्या जंक्शन रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘अयोध्या धाम जंक्शन’ असे केले आहे. फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार लल्लू सिंह यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, नव्याने बांधलेल्या भव्य अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव जनभावनेनुसार ‘अयोध्या धाम जंक्शन’ असे करण्यात आले आहे.
अयोध्येतील साधू-संत, अयोध्यावासीय आणि भक्तांच्या वतीने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, गृहमंत्री अमित शहा आणि अमित शहा, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो. उत्तर रेल्वेच्या प्रधान मुख्य व्यावसायिक व्यवस्थापकाने बुधवारी जारी केलेल्या आदेशात अयोध्या धाम जंक्शनचा स्टेशन कोड (एवाय) पूर्वीप्रमाणेच राहील, असे म्हटले आहे. अयोध्या जंक्शन आणि अयोध्या कॅंट अशी अयोध्येत दोन रेल्वे स्थानके आहेत. नावात बदल केवळ अयोध्या जंक्शनसाठी झाला आहे.