गडचिरोली : प्रतिनिधी
गडचिरोली, चंद्रपूरसह आंध्र प्रदेश, छत्तीसगड भागात सध्या नक्षलवाद्यांविरोधात छत्तीसगड पोलिस सीआरपीएफने व्यापक मोहीम उघडली आहे. नक्षलवाद्यांची रसद तोडून या राष्ट्रविरोधातील चळवळीचे कंबरडे मोडण्यात येत आहे. छत्तीसगडमधील घनदाट जंगलात मंगळवारी पहाटे ५.३० वाजता चकमक उडाली. यामध्ये १२ नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घालण्यात यश आले.
चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी चलपती ठार झाल्याने सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे.
दरम्यान, छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत धुमश्चक्री सुरू आहे. घनदाट जंगलात आज पहाटे ५ ते ५:३० वाजेदरम्यान चकमक उडाली. यामध्ये १२ नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले आहे.
बिजापूर, सुकमा-तेलंगणा बॉर्डरवर पण नक्षल्यांना टिपण्यात आले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागात सुद्धा नक्षलवाद्यांची व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दोन महिला कॅडर ठार
छत्तीसगड चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी चलपती ठार झाला आहे. ओडिशा राज्यातील स्टेट कमिटीचा चीफ म्हणून नक्षलवादी संघटनेमध्ये तो पदावर होता. चलपती हा जवळपास ३० वर्षांपासून नक्षल चळवळीत सहभागी होता. या चकमकीत दोन महिला कॅडर नक्षलवादी ठार झाल्या. एक एसएलआर रायफल, अम्बुंश व ईडी स्फोटके घटनास्थळावरून जप्त करण्यात आली आहेत.