23.2 C
Latur
Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रकामासाठी फे-या मारून कंटाळलेल्या व्यक्तीचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

कामासाठी फे-या मारून कंटाळलेल्या व्यक्तीचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : आज मंत्रालयात एक धक्कादायर घटना समोर आली आहे. मंत्रालयात अनेक वेळा आपल्या कामासाठी फे-या मारून देखील काम होत नसल्याने नाराज होऊन एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तो व्यक्ती आपल्या कामासाठी वारंवार मंत्रालयात येत होता. मात्र, त्याचे काम होत नसल्याने त्यांनी मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीतील सज्जावर जाऊन बसले. तिथून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात तो व्यक्ती होता. मात्र तेथील कर्मचा-यांनी व्यक्तीला वाचवले आहे.

या मजल्यावरील एका खिडकीवर बसून हा व्यक्ती उडी मारण्याच्या प्रयत्नात होता. हा प्रकार जेव्हा मंत्रालयातील कर्मचा-यांना समजला तेव्हा, त्यांनी त्याचं मन वळण्याचा प्रयत्न करत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले आहे. मंत्रालयात आपल्या कामासाठी अनेक चकरा मारून देखील काम होत नसल्याने नाराज होऊन पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या आत्महत्येचा प्रयत्न करणा-या व्यक्तीचे नाव अरविंद नारायण पाटील असे आहे. शालेय शिक्षण विभागात ते कामानिमित्त आले होते. वारंवार येऊन काम होत नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. कराड चिपळून रस्त्यात जागा गेली आहे. त्याबाबत ते आले असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्रालयात पाचव्या मजल्यारील खिडकीतून उडी मारण्याचा करणा-या ज्येष्ठ नागरिकास क्रेनच्या साहाय्याने खाली उतरवण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR