23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रअत्तराच्या गोदामाला भीषण आग; तरुणाचा मृत्यू

अत्तराच्या गोदामाला भीषण आग; तरुणाचा मृत्यू

नागपूर : प्रतिनिधी
शहरातील अति गजबजलेल्या इतवारीच्या मुख्य बाजारपेठेतील अत्तराच्या गोदामाला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका तरुणीचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनुष्का बाखडे (१७) असे आगीत होरपळून मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर तिचे आई-वडील, भाऊ हे देखील जखमी झाले आहेत.

इतवारीतील खापरीपुरा परिसरात प्रवीण बाखडे यांच्या मालकीचे रेणुका नॉव्हेल्टी नावाचे दुकान आहे. तेथील दुकानाच्या वर ते कुटुंबासह राहतात. आज सकाळी संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना तळमजल्यावरील गोडाऊनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. कुणाला काही कळण्यापूर्वी आगीने संपूर्ण इमारतीला वेढले होते.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेच अग्निशमन विभागाचे अधिकारी आठ गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले. गोडाऊनमध्ये अत्तर आणि चप्पल ठेवण्यात आले होते. प्लास्टिकच्या वस्तू असल्याने आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात मोठी अडचण येत होती. त्याही परिस्थितीत अग्निशमन दलाचे जवान घरामध्ये पोहोचले आणि त्यांनी चार जणांना बाहेर काढले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR