मुंबई : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत आज मंत्री नितेश राणे यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली. महाराष्ट्रात एक नेपाळी आहे, त्याला वाटतंय की मीच हिंदू धर्म वाचवू शकतो, असं म्हणत परबांनी राणेंना खोचक टोला लगावला.
पुढे ते असेही म्हणाले, जाती-जातीत आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या राज्यात केला जात आहे. विधान परिषदेत हे बोलत असताना अनिल परब यांच्या बाजूला उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी ते गालातल्या गालात हसत होते. माझ्या सोसायटीत नेपाळी वॉचमन आहे तो रात्रभर ओरडत असतो जागते रहो त्याला वाटत त्याच्यामुळे आम्ही सुरक्षित आहे.
पण तसं नाही. सध्या असंच एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि मीच हिंदू धर्म वाचवू शकतो असं सांगत आहे. पण हिंदू धर्म वाचवायला आम्ही समर्थ आहोत असे म्हणत अनिल परब यांनी नाव न घेत मंत्री नितेश राणे यांच्यावर जहीर टीका केली. पुढे परब असेही म्हणाले, हिंदू धर्म वाचवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, पण ते करत असताना दुस-याच्या धर्मावर आम्ही जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही, तशी आम्हची शिकवण आहे.