22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रशाळेच्या छतावर आढळले नवजात अर्भक

शाळेच्या छतावर आढळले नवजात अर्भक

- पोलिसांकडून तपास सुरू

अकोला : अकोला शहरातील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेत आज सकाळी नवजात अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अकोला शहरातील रतनलाल प्लांट परिसरातील जिल्हा परिषदच्या उर्दू माध्यमिक शाळेच्या मैदानात मुले क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू शाळेच्या टेरेसवर गेला. चेंडू काढण्यासाठी छतावर गेलेल्या मुलांना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अर्भक आढळून आले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिस घटनास्थळी पोहोचले. हे अर्भक शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

उर्दू माध्यमिक शाळेच्या टेरेसवर हे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. अंदाजे चार ते पाच दिवसांचे हे अर्भक असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्भक कोठून आले, ते कुणी टाकले यासाठी पोलिस स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR