23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
HomeFeaturedमालदीवचे रहिवाशी आणि भारतीय नागरिकांत हाणामारी

मालदीवचे रहिवाशी आणि भारतीय नागरिकांत हाणामारी

माले : वृत्तसंस्था
मालदीवचे रहिवासी आणि भारतीय नागरिक यांच्यात हाणामारी झाली. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी एका स्थानिक रहिवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मालेपासून सात किलोमीटर ईशान्येस असलेल्या हुलहुमाले येथील सेंट्रल पार्कमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली.

पोलिसांनी सांगितले की, गंभीर जखमी झालेल्या दोघांना हुलहुमाले रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला. पोलिसांनी सांगितले की, उद्यानात मालदीव आणि भारतीय यांच्या गटामध्ये संघर्ष झाला आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मालदीवमध्ये भारतीयांसोबतची ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. मालदीवचे मुइज्जू सरकार चीनच्या तालावर नाचत असून एकापाठोपाठ एक भारतविरोधी पावले उचलत आहेत. मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू यांनी भारतीय जवानांना परत पाठवले आहे. मुइज्जू सरकार चिनी कंपन्यांना अतिशय वेगाने प्रकल्प देत आहे. त्याचवेळी भारतीय पर्यटकांनी मालदीवला टाळल्याने तेथील पर्यटन उद्योग अडचणीत आला आहे.

भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंध सध्या ताणले गेले आहेत. चीन समर्थक पक्ष सत्तेत आल्याने ते भारताशी पंगा घेत आहे. मोहम्मद मुईज्जू हे चीन दौरा करुन आल्यानंतर त्यांची भारतविरोधी भूमिका आणखी तीव्र झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR