18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमेळघाटात महायुतीत ठिणगी?

मेळघाटात महायुतीत ठिणगी?

राजकुमार पटेल यांच्या उमेदवारीवरून वादंग

अमरावती : प्रतिनिधी
मेळघाट तसा कायम कुपोषणासाठी परिचित आहे. पण सध्या राजकीय उमेदवारीवरून हा परिसर चर्चेत आला आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे सध्या शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. कडू यांनी राज्यात महायुतीचा हात सोडून तिस-या आघाडीचा प्रयोग राबवला आहे. त्यातच पटेल हे जवळचे मित्र असले तरी त्यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्र्यांनी एक घाव दिला आता आम्ही दहा घाव देऊ असे ते म्हणाले होते. पण आता या स्टोरीत एक ट्विस्ट आला आहे.

राजकुमार पटेल यांचं प्रहार पक्ष सोडणं ही भाजप-शिवसेनेची खेळी आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. अजूनही दोन-तीन महत्त्वाचे कार्यकर्ते जे जाण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट त्यांनीच केला. प्रत्येकाचा वैयक्तिक स्वार्थ असतो. ते त्यांनी करावं. ते तिथे जात आहेत त्यांनी तिथे सुखी राहावे. राजकुमार पटेल यांनी सांगितले की दोस्ती कायम राहील तर आम्ही दोस्ती कायम ठेवून राजकुमार पटेलविरोधात उमेदवार देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार रवी राणा आक्रमक
प्रहारचे राजकुमार पटेल यांना शिवसेना शिंदे गटात बच्चू कडू यांनीच पाठवले असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात साठ गाठ आहे. तर बच्चू कडू यांचीच ही खेळी आहे असा आरोप रवी राणा यांनी केला. त्यामुळे आता राजकुमार पटेल यांच्या उमेदवारीवरून महायुतीतच ठिणगी पडल्याचे दिसून आले आहे.

तर विरोधात काम करू
शिवसेनेने मेळघाटमध्ये राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिल्यास आम्ही विरोधात काम करू, असा इशारा राणा यांनी दिला आहे. आमदार बच्चू कडू सोयीनुसार राजकारण करतात, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. येणा-या काळात बच्चू कडू यांचा हिशेब ठेवू असा इशाराही राणा यांनी दिला. ‘बाप बडा ना भैय्या सबसे बडा रुपय्या’ अशा प्रकारे बच्चू कडू यांचे राजकारण आहे, अशी टीका त्यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR