22.9 C
Latur
Sunday, March 3, 2024
Homeमहाराष्ट्रधावत्या ट्रकचा टायर निखळला; एक ठार

धावत्या ट्रकचा टायर निखळला; एक ठार

वाशिम: धावत्या ट्रकचा टायर निघून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या अंगावर गेल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत एक जण जखमी झाला आहे. घटना वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील अंधार सांवंगी फाट्यावर घडली आहे. शेख मनसार शेख रोशन हे लग्नाला जाण्यासाठी मेडशी येथील अंधार सावंगी बस स्थानकावर गाडीची वाट पाहत उभे असताना धावत्या ट्रकचे दोन चाके अचानक निघून त्यांच्या अंगावर जोरदार धडकल्याने ते खाली कोसळले. त्यांना मेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेत जुम्मा छोटू गारवे हे जखमी झाले असून एका उभ्या कारचे सुद्धा नुकसान झाले आहे.

मालेगाव वरून अकोलाकडे जाणारा ट्रक क्र. आर. जे. ५० जी. ए. २०११ हा ट्रक १४ टायरचा होता. वाटेत धावत्या ट्रकची दोन चाके निखळली तरी ट्रक चालकाला काहीही कळाले नाही. यादरम्यान, घटनास्थळी उभ्या असलेल्या नागरिकांनी ट्रक थांबवत घडलेली घटना चालकाच्या निदर्शनास आणून दिली. याचदरम्यान बस स्थानकावर बसची वाट बघत उभे असलेल्या शेख मनसार शेख रोशन यांच्यावर ती चाके जाऊन आदळली. या विचित्र घटनेत शेख मनसार शेख रोशन यांचा म-त्यू झाला.

मृतकाचे नातेवाईक शेख जावेद शेख मंसार यांनी मेडशी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक राकेश जाखर (रा. सलूनडिया जि. बिकानेर) याच्या विरुध्द तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास मेडशी पोलिस चौकीचे जमादार राज बंगाले करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR