32.8 C
Latur
Monday, June 17, 2024
Homeराष्ट्रीयफुलपूरमध्ये राहुल-अखिलेश यांच्या सभेत झाली चेंगराचेंगरी

फुलपूरमध्ये राहुल-अखिलेश यांच्या सभेत झाली चेंगराचेंगरी

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. फुलपूरमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या जाहीर सभेत अनियंत्रित झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे दोन्ही नेते न बोलता तेथून निघून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, सपा उमेदवार अमरनाथ मौर्य यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या सभास्थळी सपा प्रमुख अखिलेश येताच कार्यकर्ते नियंत्रणाबाहेर गेले आणि राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना पाहण्यासाठी बॅरिकेड्स तोडून स्टेजपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या चेंगराचेंगरीमुळे प्रसारमाध्यमांचे कॅमेरेही तुटले आहेत. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची संयुक्त रॅली आज फुलपूरच्या पंडिला येथे आयोजित करण्यात आली होती.

मात्र या घटनेमुळे दोन्ही नेत्यांनी रॅलीला संबोधित न करता निघून जाणे पसंत केले. अलाहाबादमध्ये काँग्रेसचे उमेदवार तर फुलपूरमध्ये सपाचे उमेदवार अमरनाथ मौर्य निवडणूक रिंगणात आहेत. दोघांच्या समर्थनार्थ ही संयुक्त रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र या रॅलीत चेंगराचेंगरी झाली. या कारणावरून दोन्ही नेते काहीही न बोलता निघून गेले. यानंतर प्रयागराजच्या मुंगारीमध्ये राहुल आणि अखिलेश यांची संयुक्त सभा झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR