23.1 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रबनावट दारूसह गांजाचा साठा जप्त

बनावट दारूसह गांजाचा साठा जप्त

धुळे : प्रतिनिधी
शहरातील वाडीभोकर परिसरात एलसीबीच्या पथकाने आज एका घरावर धाड टाकीत बनावट मद्याच्या कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईत बनावट दारुसह गांजाचा मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केला असून या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

धुळे शहरालगत असलेल्या वाडीभोकर परिसरात नाल्या किनारी एका घरात बनावट मद्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पथकाने तात्काळ मद्याच्या कारखान्यावर छापा टाकला.

यावेळी तेथे मद्य बनविण्यासाठी आवश्यक असलेले सुमारे २०० लिटर स्पिरीटचा साठा पोलिसांच्या हाती लागला. शिवाय बनावट मद्याचे सात खोकेही आढळले. यासह पोलिसांनी या ठिकाणची झाडाझडती घेतली असता जवळपास १५० गोण्या भरून गांजा पोलिसांच्या हाती लागला. जप्त केलेल्या या ऐवजाची किंमत अंदाजे कोट्यवधीच्या घरात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. दरम्यान, धुळे जिल्ह्यातील ७ अट्टल गुन्हेगारांना वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR