26.1 C
Latur
Tuesday, July 2, 2024
Homeमहाराष्ट्रप्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान

प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती

मुंबई : पंढरपूरकडे निघणा-या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला. वारकरी समाजाचे प्रतिनिधी विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला आज शिंदे यांनी हे आश्वासन दिले. दौंड येथील प्रस्तावित कत्तलखान्यास परवानगी दिली जाणार नाही असा शब्दही शिंदे यांनी वारकरी समुदायासमवेत झालेल्या बैठकीत दिला आहे.

आषाढी वारीच्या नियोजनासाठी विशेष बैठकीचे आयोजन आज सह्याद्री अतिथीगृहात करण्यात आले होते. या बैठकीत वारीच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले. गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढी वारी ‘स्वच्छ वारी निर्मल वारी’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याबरोबरच प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला सहा प्रमुख दिंड्यांचे प्रतिनिधी, फडांचे प्रमुख, वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर, पंढरपूर संस्थानचे गहिनीमहाराज औसेकर, तसेच राज्य प्रशासनातील सर्व संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

कत्तलखाना रद्द करण्याचा निर्णय
दौंड येथील कत्तलखाना रद्द करण्यासाठी बंडातात्या कराडकर हे आंदोलनाच्या पविर्त्यात होते. या कत्तलखान्यामुळे भीमा आणि इंद्रायणी नदी अपवित्र होईल असे वारक-यांचे म्हणणे होते. त्यामुळे वारक-यांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन शासनाने हा कत्तलखाना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR