27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeपरभणीगंगाखेड शहरातील शिक्षकाची कुटुंबीयासोबत आत्महत्या

गंगाखेड शहरातील शिक्षकाची कुटुंबीयासोबत आत्महत्या

गंगाखेड : शहरातील रेल्वे उड्डान पुलाजवळील रेल्वे पटरीवर शहरातील ममता विद्यालयातील शिक्षकाने कुटुंबीयासह आत्महत्या केल्याची घटना गुरूवार, दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे व पोलिसांनी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले. दरम्यान संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू न शकल्याने या घटनेची चर्चा होताना दिसून येत होती.

दरम्यान आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव मसनाजी सुभाष तुडमे(४५) वर्ष असल्याचे पोलिस प्रशासन मार्फत सांगण्यात आले आहे. ते शहरातील ममता विद्यालयामध्ये शिक्षक होते. त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी उघडकीस आली. दरम्यान कुटुंबीयांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. या घटनेत आई-वडील आणि मुलीने आत्महत्या केली आहे.

या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत होती. या घटनेची माहिती मिळतात उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे आणि सहाय्यक पोलिस निरिक्षक पोलिस उपनिरीक्षक असद शेख, जमादार व्हावळे, पोलिस शिपाई परसेवाड आदी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत मृतदेह ताब्यात घेण्याचे काम सुरू केले होते. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR