27.1 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeराष्ट्रीयउत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली

उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली

२८ जणांना काढले बाहेर आजूबाजूचा परिसर केला रिकामा

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये मोठा अपघात घडला. लखनऊच्या ट्रान्सपोर्ट नगरमधील एक इमारत अचानक कोसळली. पिलरवर बांधकाम सुरू असलेली इमारत पडताच केवळ ढिगाराच उरला. या इमारतीत अनेक औषधी कंपन्यांची गोदामे असल्याचे माहिती समोर आली आहे. अपघातावेळी या गोदामात अनेक कामगार उपस्थित होते आणि ते ढिगा-याखाली दबले गेले आहत. त्यामुळे प्रशासनाकडून मदत बचाव कार्य सुरू आहे.

इमारतीच्या ढिगा-याखालून आतापर्यंत २८ लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित २४ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये शनिवारी ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. या अपघातात इमारतीजवळ उभ्या असलेला ट्रकही ढिगा-याखाली गाडली गेला. इमारत कोसळल्याने घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली होती. अद्यापही अनेक जण ढिगा-याखाली अडकल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या पोलिस दल आणि इतर मदत पथक घटनास्थळी पोहोचले असून इमारतीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. खबरदारी म्हणून आजूबाजूच्या इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. हरमिलाप टॉवर असे कोसळलेल्या इमारतीचे नाव आहे.

ही तीन मजली इमारत असून त्यातील अर्धी इमारत कोसळली आहे. इमारत कोसळल्यानंतर २८ जखमींना ढिगा-याखालून बाहेर काढण्यात आले. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. ज्या रुग्णांची प्रकृती गंभीर आहे त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे ट्रान्सपोर्ट नगरजवळील शहीद पथावर जुनी इमारत कोसळल्याचे म्हटले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही गांभीर्याने घेत तातडीने मदतीच्या सूचना दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR