18.8 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रभाजपचे कार्यालय फोडणा-याला तिकिट, एवढी लाचारी?

भाजपचे कार्यालय फोडणा-याला तिकिट, एवढी लाचारी?

अमरावती : प्रतिनिधी
नवनीत राणा यांनी भाजपाच्या गोटात जात लोकसभेची उमेदवारी जरी मिळविली तरी देखील त्यांची डोकेदुखी काही कमी होण्याचे नाव घेत नाही. एकीकडे बच्चू कडू आणि दुसरीकडे आनंदराव अडसूळ यांच्यासोबतचे त्यांचे राजकीय वैर स्वस्थ बसू देणार नाही.

आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनी राणांविरोधात अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे कडू यांनी देखील राणांचा प्रचार न करता चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. भाजपचे कार्यालय फोडणा-याला तिकिट मिळाले, एवढी लाचारी? असे म्हणत बच्चू कडू यांनी राणांना विरोध केला आहे.

दरम्यान, राणा यांना भाजपात आयात करून उमेदवारी दिल्याने भाजपातील छुपे विरोधक देखील नाराज असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कडू यांनी मोदींच्या ४०० पारच्या लक्ष्यावर महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. अबकी बार ४०० पार ही घोषणा आहे. एखादी जागा पडली तरी काही फरक पडणार नाही, असे कडू म्हणाले आहेत. तसेच भाजपवरदेखील कडू यांनी टीका केली आहे. भाजपचे कार्यालय फोडणा-याला तिकिट मिळाले, एवढी लाचारी? ज्यांनी शिवीगाळ केली त्यांना तिकिट मिळाले आहे. कोण निवडून येईल यापेक्षा कोणाला पाडायचे हे एकदा निश्चित झाले पाहिजे, त्यासाठी आम्ही कामाला लागलो आहोत, असा इशारा कडू यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR