पुणे : राज्यात सुरू असणा-या उसाच्या गाळप हंगामात उसाअभावी एकूण २२ साखर कारखाने बंद झाले असून आजवर साखर उतारा १०.९ टक्के इतका मिळाला आहे. गतवर्षी यावेळेपर्यंत ७८ साखर कारखाने बंद झाले होते, अशी माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून उपलब्ध झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार यंदाच्या गाळप हंगामात सहकार आणि खासगी असे मिळून २०७ कारखान्यांनी हंगाम घेतला. यंदा उसाच्या उपलब्धतेबाबत थोड्याफार प्रमाणात साशंकता होती कारण अवेळी पावसाचा परिणाम झाला होता. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलली आणि उसाची उपलब्धता वाढली. आपोआपच हंगामाचा कालावधी वाढला आहे. राज्यात सोलापूर विभागातील सर्वांत जास्त कारखाने बंद झाले असून त्यांची संख्या ७ इतकी आहे. तर साखर उत्पादन ९५२.९४ लाख क्विंटल झाले असून ९४४.८२ मे. टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात एकूण २०७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला असून त्यामध्ये सहकारी कारखाने १०३ आहेत.