24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeनांदेडट्रॉलीसह ट्रॅक्टर पुलावरून कोसळले; बालमजूर ठार, दोघे गंभीर

ट्रॉलीसह ट्रॅक्टर पुलावरून कोसळले; बालमजूर ठार, दोघे गंभीर

मुदखेड : प्रतिनिधी
ट्रॉलीसह ट्रॅक्टर नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक बालमजूर ठार झाला तर दोन बालमजूर गंभीर जखमी झाले. सदर घटना दि. २७ मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास मुदखेड तालुक्यातील राजवाडी नदीच्या पुलावर घडली.

मुदखेड तालुक्यातील पारडी वैजापूर येथून दि. २७ रोजी मुदखेडकडे शेणखत टाकून मुदखेडकडे परत निघाले होते. सकाळी नऊच्या सुमारास ट्रॅक्टर राजवाडी नदीजवळ पुलावरून ट्रॉलीसह खाली कोसळले. या दुर्घटनेत तेजस अशोक शिंदे वय १५ राहणार तिरकसवाडी याचा मृत्यू झाला. तर ट्रालीत बसलेले रामेश्वर मारुती साबळे वय १७ आणि बालाजी मारुती शिंदे वय १८ हे दोघे गंभीर जखमी झाले. या दोघांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान घटनास्थळी पारडी येथील नागरिकांनी धाव घेत जखमींना मदत केली. जेसीबीच्या साह्याने अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यात आले. गेल्या काही दिवसांत या भागात दोन वेळा अपघात झाले आहेत. या परिसरात वळण रस्ता असल्यामुळे अपघात होत असल्याचे सांगण्यात येते. आठ दिवसांपूर्वीच याच परिसरामध्ये येळी माटी पुलावरून क्रुझर गाडी गोदावरी नदीत पडून दोघांचा मृत्यू झाला होता.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR