21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रजो सच्चा शिपाई असतो, तो मैदान सोडत नाही : रमेश चेन्नीथला

जो सच्चा शिपाई असतो, तो मैदान सोडत नाही : रमेश चेन्नीथला

अशोक चव्हाणांवर काँग्रेस नेतृत्वाचे टीकास्त्र

मुंबई : दोन वेळा मुख्यमंत्री, १४-१५ वर्ष मंत्रिपद मिळाले, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य, आमदारकी, खासदारकी दिली. अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली त्यांनी कारण सांगावे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत आहे. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता माफ करणार नाही, असे रमेश चेन्नीथला म्हणाले.

काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसने टीकास्त्र सोडले. एवढे भित्रे असू नये, जो सच्चा शिपाई असतो, तो मैदान सोडत नाही, असा हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बड्या नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर सर्वांनी मिळून पत्रकार परिषद घेऊन, अशोक चव्हाणांवर हल्लाबोल केला. अशोक चव्हाण यांना काँग्रेसने काय कमी केले? असा सवाल रमेश चेन्नीथला यांनी केला.

रमेश चेन्नीथला काय म्हणाले?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सर्व नेत्यासोबत चर्चा केली. काँग्रेसमधून अशोक चव्हाण सोडून कोणीही जाणार नाही. परवा दुपारी २ वाजेपर्यंत अशोक चव्हाण आमच्यासोबत बैठकीला उपस्थित होते पण आम्हाला काही बोलले नाहीत. त्यांनी काँग्रेस का सोडली? त्यांचेकडे कुठलेही कारण नाही. काँग्रेसमध्ये त्यांना अनेक पदे देण्यात आली. मुख्यमंत्री पद त्यांना देण्यात आले. असे पक्ष सोडून जाणा-यांना जनता स्वीकारणार नाही. अशोक चव्हाण यांनी सांगायला हवे, की त्यांच्यावर ईडीचा, सीबीआयचा दबाव आहे? काँग्रेसमध्ये काही अडचण होती का? त्यांनी कुठलेही कारण पक्ष सोडताना सांगितले नाही.भाजप वॉशिंग मशीन आहे का? भाजपने ज्यांच्यावर आरोप केले, ते भाजपमध्ये गेले. व्हाईट पेपरमध्ये आदर्श घोटाळाबद्दल बोलले, मोदी आणि अमित शाह यांना जे कोणी भेटतं ते पापमुक्त होतात. आज माझी बैठक झाली, राज्यातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्याचे कारण सांगावे. ही त्यांची जबाबदारी आहे.

नांदेडचे नगसेवक आम्हाला भेटायला आले. त्यांना सुद्धा चव्हाण यांनी सांगितले नाही पक्ष प्रवेशाबद्दल. आम्ही कमजोर होणार नाही, अजून ताकदीने लढू. मी उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याशी बोललो, ते सुद्धा आपल्यासोबत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली, आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून काम करणार आहोत, महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबुतीने पुढे जात आहे, अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने काही फरक पडणार नाही, असे चेन्नीथला म्हणाले.

नाना पटोले यांचा अशोक चव्हाणांवर घणाघात
अशोक चव्हाण यांना विशेष महत्व पक्षात दिले होते. अशोक चव्हाण यांना मागच्या रांगेत आता बसावे लागेल, कारण मला तिकडचा चांगला अनुभव आहे. बाळासाहेब थोरातांसारख्या वरिष्ठांना डावलून अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद दिले. नेतृत्व करायची त्यांना सवय आहे. त्यांना तिकडे ही संधी मिळणार नाही. अजूनही आम्ही अशोक चव्हाण यांचे स्वागत करू. १५ तारखेला आमची बैठक आहे. आमच्याकडे नांदेडसाठी उमेदवार आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR