मुंबई : ‘बिग बॉस १७’ च्या घरात मोठे धमाके होताना दिसत आहेत.‘ बिग बॉस १७’ ची चाहत्यांमध्ये एक क्रेझ आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस १७’ च्या घरात मोठ्या घडामोडी या बघायला मिळत आहेत. यामुळे चाहते हैराण झाले असून ‘बिग बॉस १७’ च्या निर्मात्यांवर टिका करताना दिसत आहेत. नुकताच ‘बिग बॉस १७’ च्या घरातून दोन अत्यंत फेमस असे चेहरे बाहेर पडले. पहिल्यांदा नील भट्ट आणि रिंकू धवन हे बाहेर पडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. नील भट्ट याला तर ‘बिग बॉस १७’ चा विजेता म्हणून लोक बघत होते. तसेच रिंकू धवन देखील धमाकेदार गेम खेळताना दिसली. असे असताना देखील त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
‘बिग बॉस १७’ च्या निर्मात्यांनी ईशा हिला खास अधिकार देत घरातील एका सदस्याला बेघर करण्याचा अधिकार दिला. यावेळी तिने थेट ऐश्वर्या शर्मा हिलाच बेघर केले. ज्यानंतर ईशा हिच्यावर जोरदार टिका ही करण्यात आली. आता ऐश्वर्या शर्मा हिच्या पाठोपाठ थेट नील भट्ट हा देखील बेघर झालाय. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का नक्कीच बसला आहे.
नील भट्ट आणि रिंकू धवन यांच्यानंतर आता थेट तिसरे एविक्शन झाले. यामध्ये अनुराग डोभाल हा थेट घराबाहेर पडलाय. आता अनुराग डोभाल याच्या चाहत्यांनी ‘बिग बॉस १७’ च्या निर्मात्यांच्या विरोधात आपला मोर्चा हा वळवला आहे. सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘बिग बॉस १७’ च्या निर्मात्यांवर जोरदार टिका केली जात आहे.
इतकेच नाही तर हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे देखील सांगितले जातंय. बिग बॉस १७ च्या निर्मात्यांच्या विरोधात नाराजी ही वाढताना दिसत आहे. इतकेच नाही तर अनुराग डोभाल बाहेर पडल्यानंतर एल्विश यादव याने देखील पोस्टवर कमेंट करत आपली नाराजी ही जाहिर केलीये. सध्या ‘बिग बॉस १७’ चा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.