काठमांडू : नेपाळच्या गिर्यारोहक फुंजो झांगमु लामाने अवघ्या १४ तास ३१ मिनिटांच्या कालावधीत एका महिलेद्वारे एव्हरेस्टच्या जगातील सर्वात वेगवान चढाईचा विक्रम नोंदविला आहे. फुंजो लामा यांनी ही कामगिरी करून स्वत:चाच विक्रम मोडला आहे. याआधी यापूर्वी फुंजो लामा यांनी २०१८ मध्ये ३९ तास ६ मिनिटांत गिर्यारोहण पूर्ण केले होते.
नेपाळी वंशाच्या महिला गिर्यारोहकाने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या महिला गिर्यारोहकाने १५ तासांपेक्षा कमी कालावधीत जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले आहे. पर्यटन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळच्या फुंजो लामा यांनी गुरुवारी सकाळी ६.३ वाजता ८,८४८ मीटरची चढाई केली. त्यांनी ८,८४८.८६ मीटर (२९.०३१ फूट) एव्हरेस्ट डोंगरावर स्केंिलग केले. हिमालयातील शिखराला सर करण्याचा तिचा हा तिसरा प्रयत्न होता. लामा यांनी बुधवारी दुपारी ३.५२ वाजता बेस कॅम्पवरून चढाई सुरू केली आणि गुरुवारी सकाळी ६.२३ वाजता शिखर गाठले. तिने बेस कॅम्पवरून १४ तास ३१ मिनिटांत शिखर गाठले आहे.
याआधी नेपाळच्या दिग्गज गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी बुधवारी ३० व्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करून इतिहास रचला होता. शेर्पाने १० दिवसांपूर्वी जगातील सर्वात उंच शिखरावर चढाई करण्याचा स्वत:चा विक्रम मोडला होता.